Search This Blog

Sunday, 23 August 2020

गणपती २०२० छायाचित्रे स्पर्धा

 

मोरया आर्ट आणि मार्ट प्रस्तुत आपण गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती छायाचित्रे स्पर्धा आयोजित केली आहे.

आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे अशी आमची विनंती असून आम्हास भरगोस प्रतिसाद द्यावा.

स्पर्धेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल,
१. आपल्या गणपतीची छायाचित्रे काढून, त्यातील सुंदर छायाचित्रे आम्हला पाठवा.
छायाचित्र पाठवण्यासाठी खालील मजकुरावर जावे,
२. तुमच्या गणपतीचे छायाचित्र आमच्या मोरया आर्ट आणि मार्ट यावर Send Message च्या मदतीने पाठवावे.
३.आम्ही तुमच्या गणपतीचे छायाचित्र आमच्या मोरया आर्ट आणि मार्ट या समूहावर प्रस्तूत करू.
४. छायाचित्रात तुमचे नाव नमूद करू (तुम्हाला छायाचित्र Tag करण्यासाठी Page Like करणे आवश्यक).
५. जास्तीत जास्त आवड (Likes) असलेल्या छायाचित्राला विजेता घोषित करण्यात येईल.
६. विजेता छायाचित्र घोषित करण्यासाठी १ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११:५९ पर्यंत नोंद झालेल्या आवडी (Likes) च्या आधारे विजेता ठरवला जाईल.

धन्यवाद,
मोरया आर्ट आणि मार्ट

कृपया खालील मजकुरावर तुमचा प्रतिसाद नोंदवा,

Friday, 21 August 2020

आमचो गणपती बघूक येवा हां.....!

 

" तुमचो पाट कोणाकडे आसता ?"


हा प्रश्न तुम्हाला थोडी तरी कोकणी पार्श्वभूमी नसेल तर सहसा कळणार नाही पण जो पक्का कोकणी असेल त्याच्यासाठी हा प्रश्न म्हणजे एका मोठ्या संभाषणाची सुरुवात असते.


'पाट देणे' हा एक खास कोकणी वाक्प्रचार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. वास्तविक पाहता, पाट देणे ही वरवर सामान्य वाटणारी क्रिया पण कोकणी माणसाचं मन त्यात गुंतलं की तो उत्सवाचा भाग बनतो. साधारणपणे नागपंचमी झाली की पाट देण्याची ही लगबग सुरू होते. पाट कुणाकडे द्यायचा हे फिक्स असतं. वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेचा तो एक भाग असतो. हा पाट म्हणजे 'गणपतीचो पाट!' गावात ठराविक मूर्तिकार असतात, त्यांच्याकडे जाऊन गणपतीचा हा पाट देणे म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल असते. याच पाटावर गणपतीची मूर्ती विराजमान होते. हा पाट खास गणपतीसाठीच राखीव असतो आणि दरवर्षी हा पाट देण्याचा सोहळा असाच घडत असतो.मूर्तिकाराला पाट देतानाच आपल्याला गणपतीबाप्पाची मूर्ती कशी हवी आणि केवढी मोठी हवी याचीही माहिती दिली जाते. काहीजणांकडे असणारी मूर्ती ही दरवर्षी एकाच स्वरुपात असते मात्र काहीजणांकडे वेगवेगळ्या रूपात पहायला मिळते. अनेकजण गणपतीसमोर विविध पौराणिक/सामाजिक देखावेही साकारतात. त्यासाठी तशी मागणी पेंटरकडे केली जाते. (काही ठिकाणी मुर्तीकाराला पेंटर असंही म्हणतात ) गणपतीशाळेत जाऊन हे गणपती मूर्तिकार रंगवत असताना पाहत बसणे ही लहानधाकट्यांसाठी मोठी पर्वणीच असते.


पाट देऊन झाल्यावर मग अजून एक प्रश्न पुन्हा कानावर पडतो,


" भित रंगयलास?"


सणासुदीसाठी आवश्यक असणारी नेहमीची साफसफाई केली जात असतानाच 'भिंत रंगवणे' हा एक अतिशय महत्वाचा भागही त्यात समाविष्ट असतो. प्रत्येकाच्या घरात गणपती ठेवायची जागा ठरलेली असते. लाकडी टेबल किंवा खास बांधून घेतलेला ओटा असतो तिथेच गणपतीची मूर्ती बसणार असते. ( 'गणपती बसणे' हाही आमच्याकडचा एक खास वाक्प्रचार आहे. ) जिथे ही जागा असते त्या मागे म्हणजे गणपतीच्या मागे असणारी भिंत रंगवणे हादेखील एक महत्वाचा भाग असतो. 'रंगवणे' म्हणजे चित्र काढणे. पूर्वी, अनेकदा या ठिकाणी निसर्गचित्रच पहायला मिळत. अधिकतर, एखादा वाडेकरी (म्हणजे वाडीतच वास्तव्यास असणारा ) हे काम करत असे. हळूहळू यात बदल होऊन वेगवेगळी चित्रे येऊ लागली आता तर काहीजण चित्रं असलेला पडदाही लावतात पण ती भिंत रंगवण्याची आणि ती रंगवलेली पाहण्यात असणारी मजा वेगळीच असायची.


यानंतर असतो सर्वात आनंददायी भाग तो म्हणजे माटवी किंवा माटी बांधायचा. माटी म्हणजे लाकडी चौकट. गणपतीच्या आसनावरती ही लाकडी चौकट छतासारखी बांधलेली असते. माटी ही कोकणच्या गणेशोत्सवाचं एक महत्वाचं अंग आहे, ठळक वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल. माटी सजवणे म्हणजे सर्वप्रथम माटी खाली काढून साफ करणे इथपासून सुरू होते. या माटीला खास पावसाळ्यात उगवणारी विविध रानफळे, पत्री बांधली जातात. हरणं(छोटी पिवळी फुलं असणारी एक वनस्पती ), तेरडा, शेरवडा(पावसाळ्यातच दिसणारी एक खास वनस्पती), कांगला, काकडी, कवंडळा, नारळ, कच्च्या सुपारीची पेंडी (घोस) तसेच आंब्याचे टाळ (डहाळा), सावंतवाडीची लाकडी फळं इत्यादी माटवीळा बांधून माटवी सुशोभित केली जाते. ही फळं किंवा फुलं बाजारात विकत मिळत असली तरी आवाठात (म्हणजे वाडीत ) किंवा रानात फिरून ती गोळा करण्यात एक वेगळाच आनंद असतो.


यानंतर इतर सजावट केली जाते. तोरणं बांधणे, मखर बांधणे, लायटिंग करणे हे आवडीचे काम घरातील तसेच आजूबाजूची बाळगोपाळ मंडळी मोठ्या आनंदाने करतात. मातीची जमीन असेल तर शेणाने मस्त सारवून घेतली जाते. नंतर जमिनीवर मस्त रांगोळ्या काढल्या जातात. सर्व सजावटीमध्ये आणि एकूण भक्तिमय वातावरण करण्यामध्ये कोकणी माणूस कुठेही कसर सोडत नाही. 


कोकणातील गणेशोत्सवाचं अजून एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोकणी माणूस कुठेही असला तरी तो 'गणपतीक गावाक येतलो म्हणजे येतलोच !' मुंबई-पुण्याहून 'चाकरमानी' गावी येतात. त्यासाठी चार-चार महिने अगोदर त्यांनी आरक्षण करून ठेवलेलं असतं. एक दोन दिवस अगोदरच ही मंडळी गावी दाखल होतात आणि त्यानंतर रंगणार्‍या गप्पा, पुढील प्लॅन्स , पेटार्‍या-बिटार्‍याची तयारी, गरंडेल इत्यादी फटाक्यांच्या सामानाबरोबरच विविध फळफळावळ, मोदकांचे बॉक्सेस ... काय आणि काय ! विचारू नका ! बाप्पा घरी येण्याआधी वातावरण असं अगदी 'बाप्पामय' होऊन जातं. एवढी सगळी जय्यत तयारी झाल्यावर मग सगळे मिळून बाप्पाची मूर्ती आणायला गणपतीशाळेत जातात. पाट दिल्याप्रमाणे आपापला गणपती शाळेतून घेतला जातो आणि मग डोक्यावर ती मूर्ती घेऊन (फार मोठी असेल तर मोठ्या गाडीतून ) वाजत गाजत "मोरयाsss मोरयाsss"च्या जयघोषात फटाके वाजवत घरी आणली जाते. शक्यतो आदल्या दिवशी मूर्ती आणली जाते ( क्वचितप्रसंगी गणेश चतुर्थीच्याच दिवशीही आणली जाते ) मग पहाटे लवकर उठून अंघोळी वगैरे वगैरे उरकून बाप्पाच्या पूजेची तयारी केली जाते आणि गुरुजी आले की त्यांच्या सुचनेनुसार सिद्धीविनायकाची यथासांग प्राणप्रतिष्ठापना केली जाते.


अस्या मृण्मयमुर्तौ प्राणप्रातिष्ठापने विनियोग :


|| एकदन्तं शूर्पकर्ण गजवक्त्र चतुभूर्जम् ||

|| पाशांकुशधरं देवं ध्यायेत सिद्धीविनायकम् ||


बाप्पाचं पूजन झाल्यावर घरातील सर्वजण बाप्पाचं दर्शन घेतात, फुले वाहतात आणि त्यानंतर आरती केली जात. आरती करतानाचा उत्साह बघण्यासारखा असतो टाळ तसेच टाळ्या कधी तबलाही वाजवून आरती केली जाते. मग प्रसाद वाटला जातो. कोकणात भजनी मंडळांची एक परंपरा आहे. गणपतीमध्ये ही भजनी मांडले घरोघरी भजने करतात आणि इथून पुढील काही दिवस घरोघरी गाणी, भजने, आरती या ना त्या मार्गे फक्त बाप्पा आणि बाप्पाचाच नामघोष सुरू असतो. त्यानंतर मात्र एकच वाक्य सगळीकडे ऐकू येत असतं,


"आमचो गणपती बघूक येवा हां !"


गणपती बाप्पा ssss

मोरया ssssssssssssssss


~ ©️अनिल विद्याधर आठलेकर

चेंदवण, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

मोबाईल - 9762162942


गणेशचतुर्थी, २२ ऑगस्ट २०२०

Thursday, 19 September 2019

ganpati visarjan

Ganpati Chaturthi celebrations across India are truly unmissable. But have you ever wondered what happens on the last day of Ganpati puja? The results are heartbreaking. Thousands of idols are immersed after the processions end and the rivers and beaches across India are left dirty.

While we headed to the beaches in droves for Ganpati idol immersion few stayed back to clear up the mess that came after. But not all hope is lost. This photo story shows first the celebrations, then the effort made by a concerned few to reclaim clean beaches.

Sunday, 8 September 2019

गणपती २०१९ स्पर्धा

गणपती २०१९ स्पर्धा....
आम्ही विनंती करतो कि जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे आणि हि पोस्ट सर्वाना पाठवावी.
विजेता शनिवार दिनांक १४.०९.२०१९ रोजी घोषित केला जाईल.
स्पर्धेची अंतिम तारीख १२.०९.१९ (गुरुवार).

कोकण म्हणजे स्वर्ग

कोकणातील गणेशोत्सव ही सांगण्या ऐकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे.

गणपतीची मूर्ती

पूर्वी शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जात असत. कालांतराने प्लास्टर ऑफ पॅरीस पासून मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे आणि त्यांना लावलेल्या रंगामुळे अशा मूर्तींच्या विसर्जनानंतर होणारे जलाशयांचे प्रदूषण लक्षात घेता अनेक जलाशयांमध्ये मूर्ती विसर्जनास बंदी घालण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गणपतीची मूर्ती दान करण्याचे अभियान राबवण्यात येते.अलिकडच्या काळात पर्यावरण स्नेही शाडूच्या मूर्ती बनवण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक शाळांमध्ये आणि अनेक संस्थातर्फे शाडूच्या मातीच्या गणपती मूर्ती बनवण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येतात. आज पर्यावरणाच्या बदलत्या परिस्तिथीला बघून अनेक लोक शाडू मातीच्या गणपती मूर्तीमध्ये झाडांच्या बिया ठेवतात आणि गणपती मूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन सुद्धा करतात. यामुळे पाण्याचे प्रदूषण हि होत नाही आणि गणपती मूर्तीचे यथायोग्य पद्धतीने विसर्जन सुद्धा होते. अश्या पद्धतीने विसर्जन केल्यामुळे विसर्जन केलेल्या ठिकाणी नवीन झाड येते. त्यामुळे पर्यावण जपण्यासाठी थोडीशी मदत हि होते.

गणपतीची जन्मकथा

एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.
काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जाऊ लागले. पहारेकर्‍याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकर्‍याचे शिरच उडवले.
पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकर्‍याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवले. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात.

गणपती बाप्पा मोरया


गणपतीचे विविध अवतार

उपपुराण मानल्या जाणार्‍या व गाणपत्य संप्रदायाचे मुख्य ग्रंथ असलेल्या गणेश पुराण व मुद्गल पुराण- ह्या दोन ग्रंथात गणपतीच्या अनुक्रमे चार व आठ अवतारांचा उल्लेख आहे.
  • गणेश पुराण – गणेश पुराणात- गणपतीचे चार अवतार अनुक्रमे सत्य, त्रेता, द्वापर व कलियुगात झाले असा उल्लेख आहे. हे होते -
    • महोत्कट विनायक – हा दशभूजाधारी व रक्तवर्णी अवतार. वाहन सिंह. कश्यप , .दिती यांच्या सन्तान म्हणून जन्मग्रहण केले व त्या कारणाने काश्यपेय नावाने प्रसिद्ध झाला. या अवतारात त्याने नरान्तक आणि देवान्तक नावाच्या दोन असुर भावांचा व धूम्राक्ष नावाच्या दैत्याचा वध केला.
    • मयूरेश्वर – हा सहा भुजांचा व श्वेतवर्णी अवतार आहे. याचे वाहन मोर आहे. त्रेतायुगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून हा जन्मला. या अवतारात सिंधू नामक दैत्याचा त्याने वध केला. अवतारसमाप्तीच्या वेळी आपले वाहन असलेला मोर त्याने त्याचा भाऊ कार्तिकेय यास दान केला अशी आख्यायिका इहे. मोरगाव येथे मोरेश्वराचे मंदिर आहे.
    • गजानन – हा चतुर्भुज व रक्तवर्णी अवतार. वाहन उंदिर. द्वापार युगात शिवपार्वतींचा पुत्र म्हणून जन्मला. या अवतारात सिंदूर नामक दैत्याच्या वध केला.अवतारसमाप्तीच्या वेळेस राजा वरेण्य यास गणेश गीता सांगितली.
    • धूम्रकेतु – द्बिभूज अथवा चतुर्भूज व धूम्रवर्णी अवतार. वाहन निळा घोडा. हा अवतार कलियुगाच्या शेवटी अवतीर्ण होईल व अनेक दैत्यांचा नाश करेल असे सांगितले जाते. विष्णूच्या कल्की अवतारावरून कल्पित.
  • मुद्गल पुराण – मुद्गल पुराणात- गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन सापडते. दुर्गुणांवरील विजय असा त्याचा भावार्थ आहे. हे अवतार खालील प्रमाणे -
    • वक्रतुण्ड – हा प्रथम अवतार. याचे वाहन सिंह असून या अवतारात मात्सर्यासुराचा (अर्थात मत्सराचा) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.
    • एकदन्त – आत्मा व परमब्रह्माचे प्रतीक म्हणून हा अवतार ओळखला जातो. हा मूषकवाहन असून वताराचा उद्देश्य मदासुराचा (अर्थात, मद/मी-पण) वध त्याने केला अशी आख्यायिका आहे.
    • महोदर – वक्रतुण्ड व एकदंताचे सम्मिलित रूप. बह्माच्या प्रज्ञेचे प्रतीक। मोहासुर (अर्थ मोह) याचा वध केला. हा अवतारही मूषकवाहन आहे.
    • गजवक्त्र वा गजानन – महोदर अवताराचे अन्यरूप. लोभासुर (लोभ) याचा वध केला.
    • लम्बोदर – ब्रह्माच्या शक्तीचे प्रतीक.वाहन मूषक. क्रोधासुराचा वध केला.
    • विकट – सूर्याचे प्रतीक. कामासुराचा वध केला. वाहन मयूर.
    • विघ्नराज – विष्णूचे प्रतीक.ममासुराचा (अहंकार) वध हा या अवतारचे उद्देश्य.
    • धूम्रवर्ण – शिवाचे प्रतीक. ब्रह्माच्या विनाश शक्तीचे प्रतीक. वाहन घोडा.अभिमानासुराचा नाश केला.

कोकणातले गणपती २०१९

Ganesh Chaturthi commemorates the birthday of Lord Ganesh. On this day, beautiful handcrafted idols of the Lord are installed both in homes and in public. Prana Pratishtha is performed to invoke the power of the deity into the idol, followed by a 16 step ritual known as Shodashopachara Puja. During the ritual, various offerings including sweets, coconuts, and flowers are made to the idol. The ritual should be performed at an auspicious time around midday, known as Madhyahna when Lord Ganesh is believed to have been born. 

It's important, according to tradition, not to look at the moon during certain times on Ganesh Chaturthi. If a person sees the moon, they'll be cursed with accusations of theft and dishonored by society unless they chant a certain mantra.

Apparently, this came about after Lord Krisha was falsely accused of stealing a valuable jewel. Sage Narada said that Krishna must've seen the moon on Bhadrapada Shukla Chaturthi (the occasion that Ganesh Chaturthi falls on) and was cursed because of it. Furthermore, anyone who saw the moon then would be cursed in a similar way.

The idols of Lord Ganesh are worshiped every day, with an aarti in the evening. The largest Ganesh statues, on display to the public, are usually taken out and immersed in water on Anant Chaturdasi.  However, many people who keep an idol in their homes carry out the immersion much before this.